मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव ते ढिवरवाडा रस्त्यावर दि.10 सप्टेंबर रोज बुधवारला दुपारी 1 वा. महसूल पथकाचे मंडळ अधिकारी संगीता हलमारे हे आपल्या पथकासह पांदन रस्त्याची पाहणी करण्याकरता गेले असता त्यांना रस्त्यावर नादुरुस्त स्थितीत असलेल्या ट्रक मध्ये विनापरवाना 10 ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सदर ट्रक व रेती असा एकूण 35 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रकचालक राकेश मेश्रान व ट्रक मालक चंद्रपाल गोमासे यांच्याविरुद करडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.