सिंगणापुर येथे अवैध दारुचे प्रमाण प्रंचड वाढलेले आहे. अवैध दारु ही सहजरीत्या तरुणांना उपलब्ध होत असल्याने गावातील तरुण पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सदरील अवैध दारु, जुगार, यांच्यावर कार्यवाही करुन गाव व्यसनमुक्त करण्यास प्रशासनाने सहकार्य करावे, अन्यथा येत्या आठ दिवसात सर्व ग्रामस्थामार्फत तिव्र उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे सिंगणापूर येथील महिलांनी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना आज सोमवार 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता निवेदन.