मेळघाटातील बैराटिकी (गडगाभाडुम) गावाजवळ वाघाने एका गोऱ्यावर हल्ला केला.या घटनेत गोरा ठार झाला.ही घटना काल गुरुवार रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.रमेश पाटील यांच्या गोधनाला चरण्यासाठी नेण्यात आले असता अचानक वाघाने झडप घातली.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेळघाटातील वाघांचा कहर दिवसेंदिवस वाढत असून कधी जनावरांवर तर कधी माणसांवर हल्ले होऊन जीवित व आर्थिक हानी होत आहे.