रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साळोखवाडी येथील आदिवासी पुरुष महिला चा मृत्यू होऊन एक महिला विजेचा शॉक लागल्याने जखमी झाली तर सालवड गावात विजेचा तार पडल्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. या घटनांना कर्जत महावितरण चे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत कर्जत पोलीस निरीक्षकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले.