चोपडा तालुक्यात चहाडी हे गाव आहे.या गावातील माळीवाडा भागातील रहिवाशी लीलाधर विजय महाजन वय ३० या तरुणाला दारूचे व्यसन होते तो अति प्रमाणात दारू पिलेला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह मुकेश पाटील यांच्या शेतात मिळून आला. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.