संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्यावतीने २५ जून २०२५ रोजी सकाळी 11 वाजता पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा समारंभ विद्यापीठ परिसरातील दृकश्राव्य सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे पार पडणार आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य तथा विद्यापीठ विद्या परिषद सदस्य, डॉ. दीपक धोटे उपस्थित....