आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात गणेश मूर्तींच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. शहरातील मोतीबाग येथील छत्रपती संभाजी महाराज विसर्जन कुंडात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. पालिकेचे कर्मचारी अत्यंत शांततेत आणि सुसज्जपणे गणेश मूर्तींच्या विसर्जनाची प्रक्रिया पार पाडत आहेत. शिवसेनेचे मेघराज भैय्या चौधरी यांनी दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या गणरायाला आज निरोप दिला जात आहे. जालना शहरातील घरगुती गणेश मूर्ती आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या मू