भंडारा जिल्ह्यातील चौधरी शैक्षणिक परिसर मांगली येथे श्री गणेश उत्सव - २०२५ या निमित्ताने ओम साई बहुउद्देशीय शिक्षण संस्था भंडारा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदान शिबिराला भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी 5 सप्टेंबर रोजी दु. 3 वाजता दरम्यान भेट दिली. यावेळी त्यांनी या ठिकाणी विराजमान झालेल्या बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले. व उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी माजी खासदार मधुकर कुकडे, किशोर चौधरी व अन्य हजर होते.