आमदार सुरेश धस यांना अटक करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहे असे मत माध्यमांसमोर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राम खाडे यांनी व्यक्त केले आष्टी तालुक्यामध्ये अनेक देवस्थान जमिनी घोटाळ्यामध्ये आमदार सुरेश धस यांचे नाव होते मात्र त्याचे नाव वगळण्यात आल्यानंतर राम खाडे आक्रमक झाले. मात्र या संदर्भात त्यांनी गंभीर आरोप केले आहेत तसेच या संदर्भात अगोदर सुरेश धस यांना अटक करा या मागणीसाठी ते सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार आहेत असे राम खाडे म्हणाले.