भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष , छबूताई वैरागडे यांच्या नेतृत्वात आज दि 13 सप्टेंबर ला 12 वाजता काँग्रेसच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व त्यांच्या आई यांच्यावर AI प्रणाली चा गैरवापर करून काँग्रेस पार्टी बिहारच्या वतीने मोदीजी व त्यांच्या आईचा अपमानकारक असा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. आणि तो सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. याचा जाहीर निषेध म्हणून काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.