देशमुख नगर तरोडा बुद्रुक लक्ष्मी माता मंदिर येथे दि २० ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ०२ ते ०३:०५ वाजेचे दरम्यान मंदिराचे कुलूप कोंडा तोडून मंदिरात प्रवेश करून मंदिरातील सोन्या चांदीचे दागिने किंमती १ लाख २० हजार ६०० व नगदी १५ हजार रुपये असा एकूण १ लाख ३५ हजार ६०० चा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी मंदिर पुजारी स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देशमुख आज करीत आहेत.