आदिवासी समाजावर मागील काही महिन्यापासून आदिवासी समाजावर सतत अन्याय अत्याचार होत आहे.धनगर व बंजारा २ समाजाला आदिवासी समाज मधून आरक्षण देऊ नये. आदिवासी विकास विभागाकडून आश्रम शाळेच्या नावाखाली योजना सांगून फसवणूक होत आहे. आदिवासी विकास मंत्री यांच्या कडून आदिवासी समाजाची दिशाभूल करत असल्याचे म्हणत दिनांक 11 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास गोंडवाना गणतंत्र पार्टी आदिवासी समाजाच्या मागण्या घेऊन एक दिवसीय धरणा आंदोलन करण्यात आले व जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले,