जळगाव शहरातील अजिंठा चौकात एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने फसवून २२ हजार ५०० रुपयांची रोकड आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी १ सप्टेंबर रोजी सकाळी ,,१० वाजता नशिराबाद येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.