औसा - जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज नाणीजधाम यांच्या सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राष्ट्रीय कार्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार देऊन यथोचित गौरव करण्यात यावा अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी (दि.२६) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात महाराजांच्या खूप मोठे कार्य असल्याचे नमूद करून महाराष्ट्रभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान व्हावा.