अकोल्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तौहिद खान समीर खान (वय २८) याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी घडली होती. मुलीचे नातेवाईक बाहेर असताना आरोपीने चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला आणि फरार झाला. १२ सप्टेंबरला इंदूर (मध्य प्रदेश) येथे लपलेला असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला अटक केली. सहा दिवसांच्या फरार होता अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.