अवघ्या 100 रुपयांच्या मजुरीच्या वादातून एका मजूराला काठीने मारहाण करण्यात आली. बुधवारी दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी मांगरुळ या गावात ही घटना घडली. या प्रकरणी मजुराच्या तक्रारीवरून मारहाण करणा-या आरोपीविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मजुराने शिविगाळ केल्याचा आरोप करत आरोपीच्या पत्नीने मजुराविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.