रेखा प्रकाश पाटील वय ६६, रा. रहिमतपूर या त्यांचा मुलगा विक्रम पाटील हा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी अॅडमिट असल्याने फळ आणण्यासाठी त्या दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सातारा एसटी स्टॅण्डसमोर आल्या होत्या. त्या रस्ता क्रॉस करत असताना अज्ञात दुचाकी चालकाने धडक दिली. त्यात त्या जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यावरुन त्या अज्ञात दुचाकी चालकावर दि. ७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता तक्रार दाखल केली आहे.