हिंदी भाषा सत्तेच्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येत असलेले पाहायला मिळत आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र भव्य असा मोर्चा देखील काढणार आहेत. या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनसे आणि ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरच्या माध्यमातून केले जात आहे. मात्र ठाण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह शरद पवारांच्या असलेले बॅनर झळकत असून हे बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.या बॅनर मुळे राजकीय वर्तुळात देखील चर्चा सुरू झाल