चोपडा तालुक्यात चुंचाळे हे गाव आहे. या गावात विजय युवराज कुंभार हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ डी. एच.१४४१ ही लावली होती. तेव्हा घराबाहेर लावलेली त्यांची ही मोटरसायकल कुणीतरी अज्ञात चोरट्याने तेथून चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला. मात्र मोटरसायकल कुठेच मिळून आली नाही.तेव्हा या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.