आज ३० सप्टेंबर मंगळवार रोजी दुपारी साडे तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार बडनेरा ते यवतमाळ मार्गे नांदगाव या रस्त्याला मान्यता मिळावी याकरिता एमएसआरडीसी चे एमडी श्री.गायकवाड यांच्याशी धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी मुंबई येथे भेट घेतली. यावेळी या मार्गामुळे दळणवळणाकरिता नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल अवगत करीत या रस्त्याला मान्यता लवकर मिळावी या संदर्भात आमदार प्रतापदादा अडसड यांनी चर्चा केली.