ताडकळस पोलीस ठाणे हद्दीतील कळगाव शिवारातील शेत आखाड्यावर ५० वर्षाच्या शेतकऱ्यांचा शेतातून जाण्यासाठी रस्ता का देत नाहीस म्हणून 29 ऑगस्टच्या रात्री राहत्या शेत आखाड्यावर आरोपी कुबेर दादाराव माने रा. कळगाव, कैलास उर्फे बाळू साहेबराव होनमने रा. ताडकळस यांनी चाकूने सपासप वार करून खून केला होता. या प्रकरणी आरोपींना पोलीसांनी अटक करून पुर्णा न्यायालयात शनिवारी हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची बुधवार ३ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.