शहरात गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुक जल्लोषात प्रारंभ झाली.दु.२ वाजताच्या सुमारास प्रथम मानाचा नरसिंग प्रांगण येथील गणपतीच्या मिरवणुकीने सार्वजनिक मिरवणुकीस सुरुवात झाली तर त्या पाठोपाठ शहरातील विविध भागातील गणेश मंडळ हे मुख्य मिरवणुकीमध्ये यात्रा चौक येथुन सहभागी झाले होते यावेळी मिरवणुकीमध्ये बँड व गाण्यांच्या तालावरती तरुणाईचा जल्लोष होता तर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोष व गुलाल फुलांची उधळण करण्यात येत होती.जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत तगडा बंदोबस्त होता