बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता बुलढाणा पोलीस दलाच्या आस्थापनेवरून नियत वयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला आहे.यावेळी पोलीस पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.