मालेगाव मध्य मध्ये 42 हजार मतचोरी, माजी आ.आसिफ शेख यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप Anc:- देशभरात मत चोरीचा मुद्दा गाजत असताना आता नाशिकच्या मालेगाव मध्य मतदार संघात देखील मतदान चोरी झाल्याचा आरोप माजी आमदार आसिफ शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन केल्याने खळबळ उडाली आहे.वेगवेगळ्या मार्गाने सुमारे 42 हजारांपेक्षा जास्त मतचोरी झाल्याचा आरोप माजी आ.शेख यांनी केला आहे. यासाठी सबळ पुरावे त्यांनी सादर केले आहे.या मतचोरी विरोधात आपण निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू.