पुणे बंगळूरू महामार्गावरील किणी टोल नाक्यावर अवैधरित्या गुटका वाहतूक करत असलेला कंटेनरसह ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडण्याची धाडशी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर आणि वडगाव पोलिसांच्या संयुक्त पथकाने मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास केली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी आज बुधवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दिली.