वाशिम जिल्ह्यात भाजीपाल्याच्या दरात मोठा चढ-उतार होत असून, याचा थेट परिणाम शेतकरी आणि ग्राहक दोघांवरही होत आहे. काही दिवसांपूर्वी ८० ते १०० रुपयांवर पोहोचलेला टमाटा आता केवळ ४० रुपयांना विकला जात आहे.अचानक वाढलेल्या पुरवठ्यामुळे दर कोसळले आहेत. त्यातच पावसामुळे भाजीपाल्याच्या गुणवत्तेत घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.दर कोसळल्याने ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नसल्याने त्यांच्याकडून शासनाने तातडीने