दूचाकी अपघातात गोंधनापूर येथील युवक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक ११ सप्टेंबर रोजी रात्री ७ वाजे दरम्यान शिरसगाव देशमुख जवळ घडली.गोंधनापूर येथील गणेश शंकर राखोंडे वय 38 वर्ष हे घराला रंगरंगोटी चे काम करतात ते खामगाव येथून घरी जात असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला या अपघातात ते जागीच ठार झाले. रुग्णवाहिकेच्या चालकांने नागरिकांच्या मदतीने त्यांना खामगाव येथील रुग्णालयात दाखल केले होते डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.