पातुर तालुक्यात मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोठारी बू, कोठारी खुर्द, पार्डी, आगीखेड, खामखेडसह अनेक गावांच्या नदीकाठावरील शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत.दोन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे मोर्णा नदीला पूर आला होता. या पुरामुळे नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी साचले असून कापूस, तूर, सोयाबीन आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनानं तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी.