जोरदार पावसामुळे ज्ञानगंगा मध्यम प्रकल्पात १०० टक्के पाणी साठा झालेला आहे. धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाचा सांडवा केव्हाही प्रवाहीत होऊ शकतो. त्यामुळे नदीला धरणाचे खाली पुर येण्याची शक्यता आहे. नदी नाल्यांना आलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे वित्तहानी /प्राणहानी झाल्यास पाटबंधारे विभाग जबाबदार राहणार नाही. नदी काठच्या लोकांना सतर्क राहणेबाबत तसेच आपली गुरे ढोरे सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे तसेच पुरापासुन सावध राहवे असे आवाहन करण्यात आले.