दि.26 ऑगस्टला 9 वाजेच्या दरम्यान गोंदिया कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुरदोली बसस्टँड जवळ उभा असलेल्या ट्रकला चारचाकी वाहनाने मागेहून जोरदार धडक दिली. या अपघातात सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.मात्र चारचाकी वाहनात बसलेले दोघे जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.मालवाहू ट्रक12 चक्का ट्रक क्र.वोडी15 एस 6642 रस्त्यावर उभा होता.ट्रक चालकाने कोणतेही प्रकारचे इंडिंकेटर व पार्किंग सुरु न ठेवता ट्रक उभा ठेवला असल्याने हा मोठा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नी सांगितले.