शेगाव तालुक्यातील बेलुरा येथील महिला २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजे दरम्यान बेपत्ता घालायची घटना बेलुरा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी जलम पोलिसांनी हरवल्याची नोंद केली आहे. बेलुरा येथील सौ वंदना सदानंद मोरे ही महिला कोणाला काही न सांगता घरुन निघून गेली. ती उशिरापर्यंत घरी परत आली नाही तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला परंतु ते कुठेच मिळून आली नाही.