माण तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे माणगंगा नदीला पूर आल्यामुळे म्हसवड शहरात ठिकठिकाणी पाणी शिरले असून, सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेले आहेत. नगरपालिकेने शनिवारी सकाळी दहा वाजता नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले असून, प्रशासनाने नागरिकांना पूल ओलांडून प्रवास करू नये, असे सांगितले आहे.