किरकोळ कारणावरून नांदूर नाका येथे निमसे व धोत्रे गटात तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत राहुल धोत्रे याचा औषध उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याचा मित्र कुसाळकर हा सुद्धा गंभीर जखमी झाला होता. या मारहाणीचे सीसीटीव्ही कॅमेरेचे व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल झाले.पोलिसांनी पंचनामा करून आडगाव पोलीस ठाण्यात भाजपाचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह 11 जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला त्यानंतर उद्धव निमसे हे फरार झाले. निमसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज हायकोर्टाने फेटाळला आहे.