आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा कांद्री येथे शेत शिवारातून विविध दोन ठिकाणी ठेवलेले स्प्रे पंप चोरीला गेल्याची घटना दि.9 सप्टेंबर रोज मंगळवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यातील फिर्यादी चंदू नारायण पिलारे व मोरेश्वर ठाकरे अशी शेतकऱ्यांची नावे असून त्यांनी आपल्या शेतातील झोपडीत पिकांवर फवारणी करिता स्प्रे पंप ठेवले असता अज्ञात आरोपींनी दोन स्प्रे पंप लंपास केले. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.