खुलताबाद शहरातील सूफी संत हजरत ख्वाजा सय्यद जैनोद्दीन मौलाना दाऊद हुसैन शिराजी उर्फ बाईस ख्वाजा रह. यांचा ६७६ वा वार्षिक उरूस १४ ते १८ सप्टेंबर २०२५ दरम्यान पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. दर्गा परिसरात रंगरोगण, स्वच्छता, प्रकाश व पाणी व्यवस्थेची कामे पूर्ण झाली आहेत.१४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चुना ची फातेहा होऊन उरूसाचा शुभारंभ होईल. १५ सप्टेंबर रोजी फराशे कार्यक्रम तर १६ सप्टेंबर रोजी रात्री संदल व मांडवाचा कार्यक्रम होईल.१७ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता नातिया मुशायरा आहे