सेलू शहरातील राजाराम नगरात होत असलेल्या मोबाईल टॉवर ला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला असून आज मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष एकत्रित येऊन मोबाईल टॉवर ला विरोध केला आहे. या टॉवरच्या रेडियशन मुळे पर्यावरण व आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, रहिवाशी भागात टॉवर उभारणे धोकादायक असताना ही, हे टॉवर उभारले जात आहे. म्हणून सर्व जण एकत्र आले.व हे टॉवर होऊ नये अशी सर्व स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे.