महाल येथील सीनियर भोसला पॅलेस येथे 297 व्या वर्षी गणपती बाप्पाचे पालखीतून आगमन होऊन आज स्थापना झाली आहे. यावेळी गणपती बाप्पाला नागपूर राजकारणाची पगडी परिधान करण्यात आली. मागील 297 वर्षापासून एकाच रंगाचा आणि एकाच आकाराचा तसेच एकाच उंचीचा गणपती सीनियर भोसला पॅलेस येथे स्थापित करण्यात येतो तसेच गणपती बाप्पा जवळ रिद्धी सिद्धी देखील ठेवण्यात येतात.