तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पोपटखेड धरण हे शनिवारी 95.75 टक्के भरले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठ्याची झपाट्याने १०० टक्के कडे वाटचाल होत आहे. यावर्षी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तालुक्यातील जलाशये देखील तुडुंब भरत असून पोपटखेड धरण हे 100% भरण्यासाठी झपाट्याने वाटचाल करत आहे तर शहापूर लघुपट बंधारे प्रकल्प हा आधीच 100% पाणीसाठ्याने भरला आहे.