सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या आदेशानुसार बार्शी तालुक्यातील खामगाव येथे आजपासून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यातून प्रवास करून महसूल विभाग व कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करीत आहेत.