आज शुक्रवार 5 सप्टेंबर रोजी वाळूज पोलिसांनी माहिती दिली की, 4 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता एका फिर्यादीने वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 3 सप्टेंबर दुपारी एक वाजता फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घराच्या बाहेर गेली ती घरी परत आली नाही, त्यांच्या अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी अपहरण करून किंवा पळून नेले असावे अशी तक्रार फिर्यादीने दिली आहे, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके पुढील तपास करीत आहे.