जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांनी शनिवारी रात्री आकस्मिक नाकाबंदी राबवून धडक कारवाई केली. या दरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या ५७ इसमांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच २४ नाकाबंदी पॉईंटवर ५९२ वाहनांची तपासणी करून १३५ वाहनचालकांवर कारवाई करीत ६८,७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एक प्रकरण नोंदविण्यात आले आहे. ही माहिती पोलीस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, जिल्हा पोलीस दल, अकोला यांनी दिनांक