बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाच्या मागणीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी पाठिंबा दिलाय.. याबाबतचे पत्र आमदार धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना पाठवले असून यामध्ये मराठवाड्यातील बंजारा समाजाला हैदराबाद स्टेट नुसार जमाती प्रवर्ग आरक्षणाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.. राज्यात मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.. त्यानंतर आता बंजारा समाजाला देखील अशाच पद्धतीने लागू करावे