नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती. मात्र सुरुवातीला हुमणी अळीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले. त्यातून थोडेफार उरलेले पीक शेतात असताना आता येलो मोजेक या रोगाने थैमान घालून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे.