धानवड या गावातील रहिवाशी गोपाल भावलाल बेलदार वय ३१ हा तरुण आपल्या पत्नीला सांगून गेला होता की मी मुक्ताईनगर शहरात जाऊन येतो. तेव्हापासून तो घरातून बाहेर गेला आणि बेपत्ता झाला. त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.