धुळे शहरातील अवधान औद्योगिक वसाहतीत चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन ठिकाणी चोरट्यांनी रोकडवर डल्ला मारुन पोबारा केल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 12 सप्टेंबर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान मोहाडी पोलीसांनी दिली आहे. अवधान औद्योगिक वसाहत नवकार इंडस्ट्री डी 4 येथे 12 सप्टेंबर शुक्रवारी पहाटे अंदाजे दोन वाजून दहा मिनिटांनी शटर तोडुन आत प्रवेश करून गल्लयातील अंदाजे वीस हजार रोख रक्कम चोरुन नेली.बालाजी ऑईल येथे हि चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश करून देव्हाऱ्यातील अंदाजे हज