बीड जिल्ह्यात पुढील तीन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज दि. 13 सप्टेंबर पासून ते 15 सप्टेंबर पर्यंत बीड जिल्ह्यात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी जोरदार सरी, वादळी वारे, गडगडाट व विजांचा कडकडाट यांची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पावसामुळे शेतकरी बांधवांनी शेतात अनावश्यक वावर टाळावा, पिकांची योग्य काळजी घ्यावी तसेच वीज पडण्याचा धोका लक्षात घेऊन मोकळ्या शेतामध्ये किंवा झाडाखाली उभे राहू नये,