जीएसटी कायदयामध्ये अनेक बदल होत आहे, याबाबतीत कांही समस्या उद्योजक व् व्यापा-यांच्या असू शकतात. त्या आमच्या पर्यंत पोचवा व यासाठी आपण एक स्वतंत्र बैठक घेवू असे प्रतिपादन प्रसाद गोरसे,अतिरिक्त आयुक्त जीएसटी, यांनी केले आहे.. असोसिएशनमधील गणपतीची आरती प्रसाद गोरसे आणि राहूल जगताप त्यांच्या हस्ते संपन्न झाली. आरती नंतर झालेल्या चर्चेत ते बोलत होते.