तारदाळ व खोतवाडी परिसरात तरस सदृश प्राण्याचा वावर दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मंगळवारी रात्री तारदाळ ते मगदूम मळा रस्त्यावर,बुधवारी जय शिवराय नगर खोतवाडीत आणि गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता समडोळे तराळ मळा येथे अशा तिन्ही ठिकाणी नागरिकांना हा प्राणी दिसल्याची माहिती मिळाली आहे.रात्रीसुमारास रावसाहेब डपाले हे मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्यावर तरस सदृश प्राण्याने झेप घेतल्याचा थरारक अनुभव त्यांनी सांगितला.