कुटुंबीयांसह गणपती दर्शनावरून परतताना ट्रकच्या धडकेत मोटरसायकल स्वार तरुण ठार झाल्याची घटना भंडारा शहरातील साई मंदिर रोडवर दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता दरम्यान उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर आरोपी ट्रकचालकावर भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्यातील मोहाडी गोवरी येथील जगदीश गजानन चकोले वय 36 वर्षे हा मोटरसायकल क्रमांक एमएच 40 एयु 6136 व अन्य एका मोटरसायकलने आपले कुटुंबीय...