तुमसर तालुक्यातील खापा खुर्द येथे दि. ७ सप्टेंबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैध मोहफुलाच्या दारू विक्री अड्ड्यावर पोलिसांनी धाड घातली असता आरोपी कमलेश ऊईके वय ३५ वर्षे रा. खापा खुर्द याच्या ताब्यातून एकूण ५ लिटर मोहफुलाची हातभट्टी दारू एकूण किंमत ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर गोबरवाही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा गोबरवाही पोलिसांनी तपासात घेतला आहे.